गहाळ कागदपत्रं, हरवलेल्या मोबाइलची पोलिसात तक्रार करण्यासाठी हे आहेत सोपे पर्याय

डिजिटल क्रांतीमुळे आता तुम्हाला घरी बसल्या ऑनलाइन पद्धतीने महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळवू शकता तसेच तक्रारी देखील नोंदवू शकता. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...

May 29, 2024 11:27 IST
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    सायबर रजिस्ट्रेशन: सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ही योजना राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. ओटीपी, लिंक, व्हिडीओ कॉलद्वारे फसवणूक झाल्यास याबाबत https://cybercrime.gov.in/ साइटवर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. याकरिता तुम्हाला सर्व तपशील साइटवर नोंदवावा लागेल.
  • Advertisement
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    मोबाइल चोरी होणे किंवा हरवणे : मोबाइल चोरी झाल्यास अथवा मोबाइल हरवल्यास याबाबतची तक्रार तुम्हाला स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करावी लागेल. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीची कॉपी मिळेल. ती कॉपी वेबसाइटवर अपलोड करावी. यामध्ये हरवलेला अथवा चोरी झालेल्या मोबाइलचा क्रमांक, आयएमई क्रमांकही सबमिट करावा. तसेच तुमचा आताचा मोबाइल क्रमांकही साइटवर नमूद करावा. कारण चोरी केलेल्या मोबाइलमध्ये कोणी सीम कार्ड टाकले तर मोबाइल ऑन झाल्याचा मेसेज तुमच्या नवीन क्रमांकावरही येईल. यावरून पोलिसांना हरवलेल्या अथवा चोरीस गेलेल्या मोबाइलचा शोध लागू शकतो. वेबसाइट - https://www.ceir.gov.in/Home/index.jsp
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    टेनंट रजिस्ट्रेशन: घरामध्ये भाडेकरू ठेवल्यास याबाबत प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची माहिती देण्यापेक्षा या साइटवर ऑनलाइन माहिती नोंदवावी. उदाहरणार्थ दिल्ली शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या मालकाचे घर मुंबईमध्ये असेल आणि त्याला आपले घर भाडेतत्त्वावर द्यायचे असल्यास याकरिता दिल्लीहून मुंबईमध्ये येण्याची आवश्यक नाही. तर ते ऑनलाइन रजिस्ट्रेशन पर्यायाच्या माध्यमातून आपण संबंधित माहिती अपडेट करू शकतात. वेबसाइट - https://services.india.gov.in/service/detail/tenant-registration
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    कॅरेक्टर व्हेरिफिकेशन : कॅरेक्टर व्हेरिफिकेशन प्रक्रियेसाठी यापूर्वी फार वेळ लागत असे. पण आताच्या ऑनलाइन पद्धतीमुळे ही प्रक्रिया अतिशय सहजसोपी झालीय आणि वेळेचीही बचत होत आहे. विशेष म्हणजे घरी बसल्या काही वेळातच कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळते. यासाठी कंपनीचे ऑफर लेटर, अपॉइंटमेंट लेटर अपलोड करावे. ही माहिती थेट तुमच्या विभागातील संबंधित पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचते. यानंतर अर्जदाराला एक मेसेज येईल आणि कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटही मिळते. वेबसाइट - https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx
  • Advertisement
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    व्ह्यु एफआयआर: ही सेवा महाराष्ट्र पोलीस सेवेद्वारे नागरिकांना पुरवली जाते. राज्यभरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयरची संक्षिप्त स्वरुपात माहिती या साइटद्वार मिळते. वेबसाइट - https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/PublishedFIRs
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    मीडिया: ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांची होणाऱ्या फसवणुकीची तक्रार आपण येथे नोंदवू शकता. यामध्ये कागदपत्रे, फोटो, व्हिडीओ अपलोड करून तक्रार नोंदवावी.
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    सिटिझन ग्रिव्हेन्स रीड्रेसल: किरकोळ स्वरुपाच्या तक्रार तुम्हाला ऑनलाइन दाखल करायच्या असतील, तर आपण या पर्यायाचा वापर करू शकता. उदाहरणार्थ शेजाऱ्याशी झालेले भांडण, इत्यादी वेबसाइट - https://pgportal.gov.in/
  • Advertisement
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    ट्राफिक ई-चलान: तक्रारदारास पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. वाहनाचा क्रमांक सबमिट करून आपण ई-चलानबाबतची माहिती पाहू शकता. ईचलानद्वारे आपण ऑनलाइनही दंड भरू शकता. वेबसाइट - https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/Payment
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    ई-कम्पलेंट्स: ज्येष्ठ नागरिकांकरीता ही सोय सर्वोत्तम आहे. यापूर्वी नियंत्रण कक्षेचा क्रमांक 100 होता. आता 112 क्रमांक नागरिकांच्या सेवेसाठी दाखल करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 1090 तर महिलांसाठी 103 हे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर कॉल करून तुम्ही मदत मागू शकता. तक्रारीनंतर पोलिसांकडून तातडीने मदत केली जाते. वेबसाइट- https://www.thanepolice.gov.in/#
  • ????? ????? ?????? ?????????? ?????????? ?????? ??? ??????? ?????? ?????????? ?????????
    याशिवाय कोणत्याही प्रकारची कागदपत्रे हरवल्यास त्याची तक्रार स्वत: तक्रारदाराला पोलीस ठाण्यात जाऊन करावी लागेल. यानंतर तुम्हाला गहाळ दाखला दिला जातो.
  • Advertisement