जाहिरात

Yugendra Pawar: शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Yugendra Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघातून राशपचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला आहे.

  • युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून सोमवारी (28 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • अर्ज दाखल करण्यापूर्वी युगेंद्र पवार यांच्या आईने त्यांचे औक्षण केले.
  • आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन युगेंद्र पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कण्हेरी येथील मारुती मंदिराचे दर्शन घेतले. राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या प्रत्येक प्रचाराचा नारळ याच ठिकाणी फोडलाय आणि सुप्रिया सुळेंनी देखील ही परंपरा कायम ठेवलीय, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत युगेंद्र पवार यांनीही मारुती मंदिरास भेट देऊन आशीर्वाद घेतल्याची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केलीय.
  • यानंतर युगेंद्र पवार यांनी बारामती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
  • बारामती येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले.
  • यानंतर त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • "बारामतीची जनता माझ्या 'तुतारी वाजविणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून देऊन आदरणीय पवार साहेबांनी दाखवलेल्या शाश्वत विकासाच्या मार्गावर चालण्याची संधी देईल, हा विश्वास आहे",असेही युगेंद्र पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट केले आहे. (Photo Credit Yugendra Shrinivas Pawar X)