NDTV मराठी लोकार्पण सोहळ्यातील सत्रात कलाकारांची रोखठोक वक्तव्य!
NDTV मराठी लोकार्पण सोहळ्यात मराठी चित्रपटक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी हजेरी लावली.
-
NDTV मराठी लोकर्पण सोहळ्यात रितेश देशमुखची खास मुलाखत देखील घेण्यात आली. रितेशने त्याच्या गाजलेला 'लय भारी' या मराठी सिनेमातील डायलॉग म्हणत 'NDTV मराठी' वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या.
-
NDTV मराठीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने रितेश देशमुखने त्यांच्या आयुष्याचा आलेख उलगडला.
-
या सोहळ्यात धारावी रॉक्स या बँडचं सुंदर सादरीकरण पार पडलं. प्रेक्षकांनीही याचा मनमुराद आनंद लुटला.
-
घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तुंना संगीत वाद्याचं रूप देत धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला.
-
या चर्चासत्रात दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री श्रिया पिळगावकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शरद केळकर सहभागी झाले होते.
-
दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले, सध्याचे निर्माते रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. त्यांना आयटम साँग आणि मसालेदार चित्रपट हवे असतात. संदेश देणाऱ्या चित्रपटात त्यांना रस वाटत वाटत नाही.
-
अमृता खानविलकर म्हणाली, आमच्याकडे प्रसिद्धीसाठी दारूचेही ब्रँड येतात, मात्र आम्ही ते स्वीकारत नाही कारण मी दारूची जाहिरात करू इच्छित नाही.
-
टेक जर्नलिस्ट अंकित वेंगुर्लेकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत लोकांना बोलतं केलं.
-
मराठी चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी ओटीटी, AI, मराठी चित्रपटसृष्टी विषयी रोखठोक मतं मांडली.
Advertisement
Advertisement
Advertisement