जाहिरात

Ola Electric ला केंद्र सरकारने धाडली नोटीस, Scooter ग्राहकांच्या तक्रारींची घेतली गंभीर दखल

ओला इलेक्ट्रिकविरोधातील रोषामुळे इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात बजाज ऑटो आणि एथर एनर्जीने मुसंडी मारली आहे.

  • ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या स्कूटरसंदर्भात असंख्य ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारने ओला इलेक्ट्रिक कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
  • गेल्या वर्षभरात हेल्पलाइन क्रमांकावरून 10 हजारांपेक्षा अधिक ग्राहकांनी तक्रार नोंदवल्या आहेत.
  • ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल आणि त्यांची कंपनी ओला इलेक्ट्रिकला नोटीस बजावली आहे.
  • स्कूटरची डिलिव्हरी उशीरा मिळणे, सुमार दर्जाची सेवा, आश्वासन दिलेल्या सेवांची पूर्तता न करणे, सदोष उत्पादने, ज्यादा किंमत आकारणे आणि स्कूटरमध्ये खराब दर्जाचे भाग वापरल्याचा ग्राहकांनी आरोप सातत्याने केला आहे.
  • ओला इलेक्ट्रिकच्या सर्व्हिस सेंटरबाहेर नादुरुस्त झालेल्या असंख्य स्कूटर धूळखात पडलेल्या आहेत. त्या दुरुस्त केल्या जास्त नसल्याने आणि सतत बिघडत असल्याने ग्राहक भयंकर त्रासलेले आहेत.
  • कंपनीने यावर तोडगा म्हणून देशभरातील 1 लाख मेकॅनिकना ओलाच्या स्कूटर दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे.