जाहिरात

OTT Release August 2024 : नेटफ्लिक्स, प्राइम, हॉटस्टारवर काय येणार नवीन?

नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि हॉटस्टारवर नव्या वेब सीरिज रिलीज होणार आहेत.

  • ऑगस्ट महिन्यात अनेक सण-उत्सव असतात आणि एकत्रितपणे 5-6 दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. जर ही सुट्टी तुम्ही बाहेर न जाता घरात बसून घालवणार असाल तर ओटीटीवर येणाऱ्या नव्या वेब सीरिज पाहू शकता. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी हॉटस्टारवर नव्या वेब सीरिज रिलिज होत आहेत.
  • फिर आई हसीन दिलरूबा (Phir Aayi Hasseen Dillruba) 2021 मध्ये आलेल्या 'हसीन दिलरूबा'चा दुसरा भाग 'फिर आई हसीन दिलरूबा' ऑगस्ट महिन्यात रिलिज होणार आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर असून यात दोघांची केमिस्ट्री आणि कट-कारस्थान पाहायला मिळेल. रिलिज डेट - 9 ऑगस्ट - नेटफ्लिक्स
  • ड्यून : पार्ट 2 (Dune: Part Two) ड्यून : पार्ट 2 चा पहिला भाग ड्यून नावासह 2021 मध्ये रिलिज झाला होता. त्यावेळी हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. तीन वर्षांनंतर याचा दुसरा भाग आला आहे. रिलिज डेट - 1 ऑगस्ट - JioCinema Premium
  • चंदू चॅम्पियन (Chandu Champion) चंदू चॅम्पियन हा चित्रपट भारतातील पहिल्या पॅरालिंपिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. रिलिज डेट - 9 ऑगस्ट - Amazon Prime Video
  • लाइफ हिल गई (Life Hill Gayi) नावावरील लक्षात येईल की ही वेब सीरिज एक कॉमेडी ड्रामा आहे. मिर्झापूर फेम दिव्येंदु शर्मा सीरिजचा मुख्य चेहरा आहे. रिलिज डेट - 9 ऑगस्ट - Disney+Hotstar
Switch To Dark/Light Mode