जाहिरात

78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पांडूरंग तिरंगी रंगात रंगला!

पाच टन फुलांपासून विठ्ठल मंदिराला तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली. यावेळी विठ्ठलाच्या पोशाखातही तिरंगी रंगाचा शेला होता.

  • भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंढरपूरचे विठ्ठल मंदिर तिरंगी रंगात रंगताना दिसून आले.
  • मंदिरामध्ये तिरंगी रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
  • तिरंगी रंगाच्या देश प्रेमात आज विठ्ठल मंदिर न्हाऊन निघाले.
  • झेंडू, शेवंती , तुळस अशा पाच टन पानाफुलांचा वापर करून संपूर्ण मंदिर हे तिरंगी रंगात सजवण्यात आले.
  • मंदिरातील सोळखांबी, चौकांबी तसेच रुक्मिणी मंदिर सभा मंडप आज फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला होता.
  • संपूर्ण मंदिरात आज तिरंगी रंगाची लहर दिसून आली.
  • स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पोशाखातही आज तिरंगी रंगाचा भरजरी शेला परिधान करण्यात आला होता.
  • एरवी भक्तीरंगात दिसणारी विठू माऊली आज मात्र भारत मातेच्या राष्ट्रीय उत्सवात रंगताना दिसली.
  • मंदिरातील फुलांच्या सजावटी सोबतच मंदिराला देखील आकर्षक अशी तिरंगी रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
  • संत नामदेव पायरी , विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे शिखर , भक्तनिवास , आणि संपूर्ण मंदिर परिसर हा तिरंगी रंगाच्या विद्युत रोषणाईने अधिक खुलून दिसतोय.