जाहिरात

700 वर्षांपूर्वी असं दिसत होतं पंढरपूरचं मंदिर! पाहा फर्स्ट लुक

सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज यांनी पाहिलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जसेच्या तसं आता अनुभवायला मिळणार आहे.

May 30, 2024 19:25 IST
  • 700 ???????????? ??? ???? ???? ????????? ?????! ???? ?????? ???
    पंढरपुरातील पुरातन विठ्ठल मंदिराचा फर्स्ट लुक समोर आलाय. ( फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर )
  • 700 ???????????? ??? ???? ???? ????????? ?????! ???? ?????? ???
    पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन व्हावे. यासाठी 73 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सध्या सुरू आहे.या अंतर्गत मंदिराला पुरातन रूप देण्यात आले आहे. ( फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर )
  • 700 ???????????? ??? ???? ???? ????????? ?????! ???? ?????? ???
    नव्याने तयार झालेले मंदिर आता भाविकांना सातशे वर्ष मागे घेऊन जाणार आहे. ( फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर )
  • 700 ???????????? ??? ???? ???? ????????? ?????! ???? ?????? ???
    विठ्ठल मंदिरातील प्राचीन पाषाणातील असणारे नक्षीकाम , खांबा वरील विविध मूर्ती, देवता, यांच्यावर असणारे नक्षीकाम यातून विठ्ठलाचा चौखांबी आणि सोळखांबी मंडप पुरातन आणि प्राचीन रूपांमुळे अधिक मनमोहक दिसत आहे. ( फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर )
  • 700 ???????????? ??? ???? ???? ????????? ?????! ???? ?????? ???
    गेल्या काही वर्षात या ठिकाणी रंगरंगोटी करून, अनावश्यक गोष्टी करण्यात आल्या होत्या. मात्र आता हे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे मूळ रूपात येत आहे. ( फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर )
  • 700 ???????????? ??? ???? ???? ????????? ?????! ???? ?????? ???
    मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी 15 मार्चपासून विठ्ठल मंदिराचे पदस्पर्श दर्शन बंद होते. दिवसातून केवळ पाच तास विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू होते. ( फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर )
  • 700 ???????????? ??? ???? ???? ????????? ?????! ???? ?????? ???
    विठ्ठल मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत असून दोन जून पासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. ( फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर )
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;