पंकजा मुंडेंना अच्छे दिन! विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर करताना भाजपाने पंकजा मुंडेंसह तीन ओबीसी नेत्यांना संधी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज त्यांनी मुंबईत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
-
चंद्रकांत पाटलांनी पंकजा मुंडेंना चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या.
-
यावेळी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर भाऊ, रावसाहेब दानवे, भुपेंद्र यादव, आशिष शेलार सर्वांचे आभार मानले.
-
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली होती. 'मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत तर मला त्यांचं शल्य राहील. त्यांना हे मी समर्पित करते, असंही त्या म्हणाल्या.
Advertisement
Advertisement