Third Gender Marriage : पुण्यातील पाच तृतीयपंथीयांचं शुभमंगल सावधान!
(प्रतिनिधी : सूरज कसबे ) हळद समारंभ, वरात, कन्यादान सर्व काही या लग्नात पाहायला मिळालं.
-
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात पहिला तृतीयपंथी समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय.
-
शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
यावेळी 5 तृतीयपंथी जोडपे विवाह बंधनात अडकले.
-
नेहमीच समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकालाही विवाहयोग्य जोडीदार सोबत हवा असतो.
-
त्यांनाही सुखी संसार थाटण्याचा अधिकार आहे.
-
तृतीयपंथी यांच्या विवाहास कायदेशीर मान्यता असल्याने सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पडला.
-
हळदीचा कार्यक्रम, वरात, कन्यादान, सप्तपदी सर्व काही या विवाह सोहळयात पाहायला मिळालं.
-
शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती.
-
हा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
-
पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. तृतीयपंथीयांशी लग्न करणारी ही मुलं LGBTQ community मधील आहेत. त्यांना समलैंगिक भावना असल्याची माहिती आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement