PM मोदींसोबत अर्ज भरताना उपस्थित असलेले गणेश्वर शास्त्री कोण आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (14 मे) वाराणसी मतदारसंघातून अर्ज भरला. त्यावेळी एका व्यक्तीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला.
-
पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रस्तावक ज्योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड उपस्थित होते.
-
गणेश्वर शास्त्री यांनी यापूर्वी अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा शूभ मुहूर्त काढला होता. पंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरण्याचा शूभ मुहूर्त देखील त्यांनीच काढला होता, असं सांगितलं जात आहे.
-
गणेश्वर शास्त्री हे ज्योतिष विश्वातील विश्वसार्ह नाव आहे. त्यांना जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कारनं गौरवण्यात आलं आहे. गणेश्वर शास्त्री यांचं कुटुंब बराच काळापासून काशीमध्ये वास्तव्याला आहे.
-
वाराणसीचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांना पंतप्रधान मोदींनी अर्ज सोपवला. त्यावेळी मोदींनी उभं राहून त्यांचा अर्ज वाचला.
-
पंतप्रधान मोदी वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
-
निवडणूक अर्ज भरताना पंतप्रधानांनी वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना उभं राहून नमस्कार केला.
-
वाराणसी लोकसभा मतदारसंघात सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement