जाहिरात

NDTV World Summit 2024: AIपासून ते विकसित भारतापर्यंत PM मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

NDTV World Summit 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV वर्ल्ड समिट 2024 या कार्यक्रमामधील उपस्थितांना संबोधित केले. यावेळेस त्यांनी भारत देशासमोरील संधी आणि आव्हानांबाबतचे मुद्दे मांडले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV वर्ल्ड समिट 2024 कार्यक्रमामधील उपस्थितांना संबोधित करताना भारत देशाशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्या भाषणादरम्यान मांडले. (Photo Credit - PTI)
  • भारताने दाखवून दिलंय की डिजिटल इनोव्हेशन आणि लोकशाही मूल्ये एकत्रित येऊ शकतात. - PM मोदी (Photo Credit - PTI)
  • भारत गृहीत धरलेले नाते निर्माण करत नाही. आमच्या नात्यांचा पाया विश्वास आणि विश्वसनीयता आहेत. ही गोष्ट जगालाही समजतेय. - PM मोदी (Photo Credit - PTI)
  • आर्टिफिशअल इंटेलिजन्स आणि अ‍ॅस्पिरेशन इंडिया या भारताजवळील दोन AIच्या ताकद आहेत. - PM मोदी (Photo Credit - PTI)
  • आमच्यासाठी AI केवळ एक तंत्रज्ञान नाहीय, तर भारतातील तरुणांसाठी संधीचे एक नवीन द्वार आहे. - PM मोदी (Photo Credit - PTI)
  • विकसित भारताच्या संकल्पाशी आज भारतातील 140 कोटी लोक जोडले गेले आहेत. ते स्वतः हा संकल्प पुढे नेत आहेत. हे लोकसहभागाचे अभियान नाहीय तर भारताच्या आत्मविश्वासाचे आंदोलनही बनले आहे. - PM मोदी
  • आम्ही काय मिळवलंय, आता हे केवळ यशाचे निकष ठरू शकत नाही. आपले पुढील लक्ष्य काय आहे, आपल्याला कुठे पोहोचायचंय; याकडे आम्ही पाहतोय. - PM मोदी
  • भारत देश आज जगभरातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. या तरुण देशाची क्षमता आपल्याला आकाशाच्या उंचीपर्यंत पोहोचवू शकते. - PM मोदी
  • गरिबीची आव्हाने आम्हाला समजतात आणि प्रगतीचा मार्ग निर्माण करणेही आम्हाला माहिती आहे. - PM मोदी
  • जगभरात चिंतेचं वातावरण असताना भारत एक आशेचा किरण ठरला आहे. - PM मोदी