PM Modi Diljit Dosanjh Meet: प्रतिभा आणि परंपरेचे मिश्रण, PM मोदींनी दिलजीत दोसांझचे केले कौतुक
PM Modi Diljit Dosanjh Meet: गायक-अभिनेता दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?
-
गायक-अभिनेता दिलजीत दोसांझने बुधवारी (1 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान दिलजीतने पंतप्रधान मोदींनी भेटवस्तूही दिली. दिलजीतने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलजीतचे स्वागत करताना "सत श्री अकाल" देखील म्हटले. दिलजीतने फोटो शेअर करत म्हटले की, "2025ची शानदार सुरुवात. पंतप्रधान मोदींसोबत झालेली संस्मरणीय भेट. आम्ही संगीतासह अनेक गोष्टींबाबत चर्चा केली."
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिलजीतसोबतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, "दिलजीत दोसांझसह शानदार चर्चा. ते खरंच अष्टपैलू आहेत. प्रतिभा आणि परंपरा यांचे मिश्रण आहेत. आम्ही संगीत, संस्कृती आणि अन्य गोष्टींशी जोडलेले आहोत."
-
व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी दिलजीतचे कौतुक करताना म्हणाले की, जेव्हा गावातील कोणी भारतीय तरुण जगभरात प्रसिद्ध होतो, तेव्हा चांगले वाटते. कुटुंबाने तुमचे नाव दिलजीत ठेवलंय आणि तुम्ही लोकांचे मन जिंकतच चालले आहात.
-
दिलजीतने यावर म्हटलं की, "भारत महान देश आहे, असे मी वाचायचो आणि जेव्हा मी देशभरात फिरलो तेव्हा मला जाणवलं की हा देश महान का आहे".
-
यावर PM मोदी म्हणाले की, भारताची भव्यता खरंच एक मोठी ताकद आहे. यावेळेस दिलजीतने गुरूनानक यांचा उल्लेख करत पंजाबी भाषेमध्ये काही ओळी गायल्या, यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याची पाठ थोपटली.
-
सामान्य कुटुंबातून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवल्याबाबत पंतप्रधान मोदींनी दोसांझचे भरभरून कौतुक केले. Photos Credit : Diljit Dosanjh Insta
Advertisement
Advertisement
Advertisement