जाहिरात

चहा पीत होता, पोलिसांनी नाश्ताही करू दिला नाही, अल्लु अर्जुनला अखेरला जामीन मंजूर

पुष्पा-2 या चित्रपटाच्या शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. संध्या थिएटरमध्ये घडलेल्या या प्रकाराला जबाबदार धरत पोलिसांनी अल्लु अर्जुनला अटक केली. तेलंगाणातील एका कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आले.

  • शुक्रवारी दुपारी अभिनेता अल्लु अर्जुन याला अटक करण्यात आली. त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
  • अल्लु अर्जुन याने तेलंगाणा उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करावा अशी मागणी त्याने केली आहे.
  • पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान रेवती नावाच्या 35 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या मुलावर अजूनही उपचार सुरू आहेत.
  • संध्या थिएटरमध्ये अल्लु अर्जुन प्रिमिअरसाठी आला होता. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
  • या प्रकरणी तेलंगाणातील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com