वाळवंटातील या कन्याशाळेत AC अन् कुलरशिवाय थंडावा; संरचनेची जगभरात चर्चा
राजस्थानातल्या वाळवंटात मध्यभागी 'राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल' शाळेची इमारत उभारलेली असून ही इमारत अंडाकृती आकाराची आहे. या शाळेच्या इमारतीचा आकार आणि संदर्भ 'स्त्रीत्वाची आणि अनंताची शक्ती' दर्शवतो असे न्यूयॉर्कच्या डायना केलॉग यांनी सांगितले.
-
उन्हाळ्याच्या कडाक्यातही दिलासा मिळू शकेल, अशा प्रकारची या शाळेची संरचना करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध आर्किटेक्ट डायना केलॉर यांनी या शाळेच्या वास्तूचं डिजाईन केलं आहे. शाळेची इमारती अंडाकृती पद्धतीने करण्यात आल्याने ही वास्तू नेमकी थंड राहते. विविध विशेषत: असलेली ही शाळा मुलींचं शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
-
जैसलमेरच्या इतिहासात राजकुमारी रत्नावतीचं महत्त्वाचं स्थान आहे. राजकन्या रत्नावती एक वीर आणि कुशल योद्धा होती. त्या वेळी देशातील अनेक भागात अलाउद्दीन खिलजीचं राज्य होतं. त्याचा सेनापती मलिक काफूर किल्ल्याला वेढा घालण्यासाठी जैसलमेरला पोहोचला.राजकन्या रत्नावती यांनी लष्करी पोशाख परिधान करून किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि रात्रंदिवस आपल्या सैनिकांसह किल्ल्याचे रक्षण केले. राजकन्येने किल्ल्याच्या तटबंदीवर चढून शत्रूला अडवलं.