वाळवंटातील या कन्याशाळेत AC अन् कुलरशिवाय थंडावा; संरचनेची जगभरात चर्चा
राजस्थानातल्या वाळवंटात मध्यभागी 'राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल' शाळेची इमारत उभारलेली असून ही इमारत अंडाकृती आकाराची आहे. या शाळेच्या इमारतीचा आकार आणि संदर्भ 'स्त्रीत्वाची आणि अनंताची शक्ती' दर्शवतो असे न्यूयॉर्कच्या डायना केलॉग यांनी सांगितले.
-
काही वर्षांपूर्वी जेसलमेर राज कुटुंबाने रत्नावती यांच्या नावाने 'द राजकुमारी रत्नावती कन्या शाळा'ची उभारणी केली. ही शाळा सिटा फाऊंडेशनमार्फत चालवली जात आहे. अखंड वाळवंटात आपल्या विशेष संरचनेमुळे ही शाळा जगात चर्चेचा विषय ठरली आहे.
-
उन्हाळ्याच्या कडाक्यातही दिलासा मिळू शकेल, अशा प्रकारची या शाळेची संरचना करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध आर्किटेक्ट डायना केलॉर यांनी या शाळेच्या वास्तूचं डिजाईन केलं आहे. शाळेची इमारती अंडाकृती पद्धतीने करण्यात आल्याने ही वास्तू नेमकी थंड राहते. विविध विशेषत: असलेली ही शाळा मुलींचं शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
-
या शाळेत किंडरगार्टन ते दहावीपर्यंत १४१ विद्यार्थिनी आहेत. ही शाळा असलेल्या गावात महिला साक्षरतेचा दर खूप कमी आहे. या शाळेत एका लायब्ररीसह प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. याशिवाय महिला सहकारी केंद्रदेखील आहे. येथील स्थानिक महिला विणकाम आणि भरतकामही शिकतात.
-
द राजकुमारी रत्नावती कन्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा गणवेश प्रसिद्ध डिजायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केली आहे. अंडाकृती आकाराच्या या शाळेत केवळ शाळाच नाही तर ४०० मुलींच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
-
जैसलमेरच्या इतिहासात राजकुमारी रत्नावतीचं महत्त्वाचं स्थान आहे. राजकन्या रत्नावती एक वीर आणि कुशल योद्धा होती. त्या वेळी देशातील अनेक भागात अलाउद्दीन खिलजीचं राज्य होतं. त्याचा सेनापती मलिक काफूर किल्ल्याला वेढा घालण्यासाठी जैसलमेरला पोहोचला.राजकन्या रत्नावती यांनी लष्करी पोशाख परिधान करून किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि रात्रंदिवस आपल्या सैनिकांसह किल्ल्याचे रक्षण केले. राजकन्येने किल्ल्याच्या तटबंदीवर चढून शत्रूला अडवलं.
-
द राजकुमारी रत्नावती कन्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा गणवेश प्रसिद्ध डिजायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केली आहे. अंडाकृती आकाराच्या या शाळेत केवळ शाळाच नाही तर ४०० मुलींच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
-
अंडाकृती आकाराच्या शाळेत एकून तीन इमारती आहेत. शाळेला ज्ञान सेंटरही म्हटलं जातं. तर प्रदर्शन भरवणाऱ्या आणि सादरीकरण केल्या जाणाऱ्या भागाला मेधा म्हटलं जातं.
-
या अंडाकृती इमारतीवर एक सोलर पॅनल बसवण्यात आलं आहे. यामुळे शाळेच्या विजेची गरज पुर्ण केली जाते. या गावातील तापमान अधिकतर ४८ डिग्री पेक्षा जास्त असतं. याशिवाय काही जाळ्या छतावर लावण्यात आल्या असून यामुळे उष्णता इमारतीच्या बाहेरच राहते.
Advertisement
Advertisement
Advertisement