Ratan Tata : रतन टाटांचा भयंकर अपमान, अपमान करणाऱ्याने मानले नंतर आभार
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
-
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा अमेरिकी उद्योगपती बिल फोर्ड यांनी अपमान केला होता. या अपमानाचा त्यांनी घेतलेला बदला हा प्रत्येक भारतीयासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे.
-
1988 साली 'टाटा इंडिका' लाँच करण्यात आली होती, मात्र या गाडीची म्हणावी तशी विक्री होत नव्हती. ज्यामुळे टाटांनी टाटा मोटर्स विकून टाकण्याचा निर्णय घेतला होता. फोर्ड मोटर्सने यात स्वारस्य दाखवले होते. रतन टाटा आणि त्यांचे सहकारी फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड यांच्यासोबत मिटींगसाठी अमेरिकेत गेले होते.
-
तुम्हाला काही माहिती नाही, कशाला हे नसते उद्योग सुरू केले; अशा शब्दात फोर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रतन टाटांना टोमणे मारण्यास सुरुवात केली होती. टाटा मोटर्स विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत अशी भाषाही त्यांनी वापरली.
-
ही मिटींग संपल्यानंतर रतन टाटांनी तडक भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. परत येताना त्यांनी टाटा मोटर्स न विकण्याचा निर्धार मनोमन पक्का केला. रतन टाटा यांनी संयम बाळगला आणि एक दिवस असा आला जेव्हा टाटांना अपमानाचा बदला घेण्याची संधी मिळाली.
-
2008 साली अमेरिकेमध्ये मंदी आली, त्याचा फटका फोर्ड मोटर्सलाही बसला होता. टाटांनी फोर्डची दोन उत्पादने जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा करार झाल्यानंतर ज्या बिल फोर्ड यांनी टाटांचा अपमान केला होता त्यांनी रतन टाटांचे ही दोन उत्पादने विकत घेतल्याबद्दल आभार मानले होते.
Advertisement
Advertisement