जाहिरात

गण गण गणात बोते! संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे बीडमध्ये जल्लोषात आगमन

बीड जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे. यावेळेस गण गण गणात बोते या मंत्राच्या गजराने वैद्यनाथ नगरी दुमदुमली.

  • बीड जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी (30 जून) आगमन झाले आहे.
  • यावेळेस गण गण गणात बोते या मंत्राच्या गजराने वैद्यनाथ नगरी दुमदुमली.
  • शक्तीकुंज वसाहतीनंतर पालखीचा मुक्काम पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये असणार आहे.
  • परळीमध्ये आगमन होताच भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
  • दिंडीमधील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
  • शेगाव ते परळी वैजनाथ असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दिंडी परळीमध्ये दाखल होते.
  • दिंडीचे 55वे वर्ष असून यामध्ये साधारण 700 वारकरी सहभागी झालेले आहेत.
  • बीड जिल्ह्यात गजानन महाराज पालखीचा चार दिवस मुक्काम असून परळी,अंबाजोगाई,बोरी सावरगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
  • सोमवारी(1 जुलै) सकाळी अंबाजोगाईसाठी पालखी प्रस्थान करणार आहे.
  • पालखी सोहळ्यामध्ये कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
  • All Photos Credit - Reporter Swananad Patil