गण गण गणात बोते! संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे बीडमध्ये जल्लोषात आगमन
बीड जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे. यावेळेस गण गण गणात बोते या मंत्राच्या गजराने वैद्यनाथ नगरी दुमदुमली.
-
बीड जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी (30 जून) आगमन झाले आहे.
-
यावेळेस गण गण गणात बोते या मंत्राच्या गजराने वैद्यनाथ नगरी दुमदुमली.
-
शक्तीकुंज वसाहतीनंतर पालखीचा मुक्काम पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये असणार आहे.
-
परळीमध्ये आगमन होताच भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
-
दिंडीमधील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
-
शेगाव ते परळी वैजनाथ असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दिंडी परळीमध्ये दाखल होते.
-
दिंडीचे 55वे वर्ष असून यामध्ये साधारण 700 वारकरी सहभागी झालेले आहेत.
-
बीड जिल्ह्यात गजानन महाराज पालखीचा चार दिवस मुक्काम असून परळी,अंबाजोगाई,बोरी सावरगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
-
सोमवारी(1 जुलै) सकाळी अंबाजोगाईसाठी पालखी प्रस्थान करणार आहे.
-
पालखी सोहळ्यामध्ये कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
-
All Photos Credit - Reporter Swananad Patil
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement