साताऱ्यातील गुलमोहर रंगोत्सवाची 25 वर्षांची परंपरा, 1 मे रोजी का साजरा गुलमोहर दिन?
साताऱ्यामध्ये 1 मे रोजी गुलमोहर रंगोत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील कारण...
-
राज्यभरात 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. पण साताऱ्यामध्ये 1 मे 'गुलमोहर दिन' म्हणून गेल्या 25 वर्षांपासून साजरा केला जातो आहे. गुलमोहर दिन म्हणजे चित्रकला, कविता, लेखन, संगीत तसेच कला आविष्कारांचा संगम साताऱ्यामध्ये पाहायला मिळतो.
-
देशाच्या वेगवेगळ्या भागातून कलाकार या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवतात. रखरखत्या उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला लाल, पिवळा गुलमोहर, बहावा वृक्ष फुललेला पाहून मनाला गारवा मिळतो.
-
कडक उन्हामुळे जेथे झाडे, रोप करपतात तेथे गुलमोहराचे झाड बहरून लोकांचे लक्ष वेधून घेते. ही बाब लक्षात घेऊन साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि यंदाचे गुलमोहर रंगोत्सवाचे 26वे वर्ष आहे.
-
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण साताऱ्यामध्ये एकत्रित येऊन गुलमोहराच्या झाडाचे, त्याच्या फुलांचे सुंदर-सुंदर चित्र रेखाटतात. सर्वच जण मिळून गाणी गायतात-कविता म्हणतात.
-
आजच्या महोत्सवामध्येही सर्वांनी चित्रे रेखाटली, चारोळ्या सादर केल्या आणि एकमेकांना गुलमोहर दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
-
गुलमोहर रंगोत्सव आता अधिक बहरू लागला आहे. कारण राज्यातील कलाकार देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत.
-
विशेष म्हणजे एकही कलाकार आपली कला सादर करताना कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत.
Advertisement
Advertisement
Advertisement