Jejuri Temple : जेजुरी गडावर शाकंभरी उत्सव साजरा; गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास
शाकंभरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते.
-
जेजुरी गडावर पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. श्री क्षेत्र जेजुरीमध्ये श्री खंडोबासोबत म्हाळसाई आणि बाणाई असल्याने या मंदिरामध्येही आज शाकंभरी उत्सव साजरा केला गेला.
-
शाकंभरी उत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली. पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता तेव्हा सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती.
-
त्यावेळी त्रैलोकातील दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले.
-
त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते. त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो.
-
यासाठी साधारण 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या. सदरील आरास नित्य वारकरी, पुजारी वर्ग, कर्मचारी सेवकरी वर्ग यांनी केली.
Advertisement
Advertisement