जाहिरात

Singham Again : मी मराठा, शिवाजी महाराजांना पुजणारा!! अजय देवगणचा रौद्रावतार

नामवंत कलाकारांची फौज असलेला सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा 5 मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये अख्खा चित्रपट 5 मिनिटांत दाखवल्याबद्दल आभार अशा भरपूर प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत.

  • रोहीत शेट्टी दिग्दर्शित सिंघम सिनेमाचा सीक्वेल 'सिंघम अगेन' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
  • या चित्रपटामध्ये अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह अशी तगडी स्टार कास्ट आहे
  • या चित्रपटामध्ये मराठी अस्मितेचा गौरव करण्याचा पदोपदी प्रयत्न करण्यात आला आहे.
  • 'तर मी मराठा नाही' , 'जय महाराष्ट्र' असे शब्द या चित्रपटातील हिरोंच्या संवादामध्ये ऐकायला मिळताहेत.
  • अजय देवगणच्या एका संवादामध्ये मी 'महात्मा गांधींना मानतो मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना पुजतो' असे वाक्य आहे. एकूणच सिनेमाचा ट्रेलर खासकरून मराठी रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.