112 वर्षे मुंबईकरांना सेवा देणाऱ्या ब्रिटीशकालीन सायन ब्रिजवर हातोडा
112 वर्षे जुना आणि मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ऐतिहासिक पूल आज तोडायला सुरुवात झाली आहे.
-
हा पूल बंद होणार असल्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. 31 जुलै 2026 मध्ये नवीन पूल तयार होणार असल्याचे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.
-
112 वर्षे जुना आणि मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ऐतिहासिक पूल आज तोडायला सुरुवात झाली आहे
-
ब्रिटीशकालीन असा हा सायन पूल धोकादायक असल्यामुळे त्याला तोडून नवीन पूल बांधला जाणार आहे. त्यामुळे आता 2 वर्षांसाठी हा पूल वाहतूकसाठी बंद असणार आहे.
-
पुनर्बांधणीच्या कामादरम्यान जनतेला शीव आरओबीच्या दोन्ही बाजूला असलेल्या पर्यायी सार्वजनिक पादचारी पूलाचा (एफओबी) वापर करता येईल.
-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये आरओबी हटवण्याची आणि स्टील गर्डर्स आणि आरसीसी स्लॅबसह नवीन आरओबी पुन्हा बांधण्याची शिफारस केली होती.
-
पूल तोडल्यानंतर येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.
Advertisement
Advertisement