जाहिरात

डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपणे ठरू शकते जीवघेणे

शांत झोप लागावी, झोपेत व्यत्यय येऊ नये, डोळ्यावर उजेड किंवा आवाज येऊ नये, थंडी वाजू नये अशा विविध कारणांमुळे अनेकजण डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपतात.

  • आपल्यापैकी अनेकांना डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपण्याची सवय असते. डोळ्यावर उजेड येऊ नये किंवा आवाजामुळे झोपमोड होऊ नये यासाठी डोळे आणि कानावर उशी किंवा पांघरूण घेऊन झोपतात.
  • डोक्यापासून पायापर्यंत पांघरून घेऊन झोपल्याने अल्झायमर, डिमेंशिया किंवा हृदयविकार होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • डोक्यावर पांघरूण किंवा उशी घेऊन झोपल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होण्याची भीती असते.
  • डोक्यासह संपूर्ण अंगावर पांघरूण असल्यास शरीरातील उष्णता वाढते. ज्यामुळे थकवा येणे किंवा डोकेदुखी वाढणे अशा समस्या होऊ शकतात.
  • मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डोक्यावरून पांघरून घेऊन झोपल्याने श्वास घ्यायला त्रास होतो. ज्यामुळे स्लीप अ‍ॅप्नीया यासारखा विकार जडण्याची भीती असते.
  • दमा असलेल्या लोकांनी डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपणे हे त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकतो.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com