लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महारॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
(फोटो सौजन्य - सुजय विखे पाटील फेसबुक)
रॅली सभास्थळी येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे तसेच महायुतीचे पदाधिकारी सभास्थळी दाखल झाले.
(फोटो सौजन्य - सुजय विखे पाटील फेसबुक)
यावेळी सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू अभिवादन केलं.
(फोटो सौजन्य - सुजय विखे पाटील फेसबुक)
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना यांच्या इंजिनमध्ये तुमच्यासाठी जागाच नाही त्यांच्या इंजिनमध्ये फक्त त्यांच्या नातेवाईकांसाठी जागा आहे, अशा शब्दात टीका केली.
(फोटो सौजन्य - सुजय विखे पाटील फेसबुक)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 13 तारखेला लंका (लंके ) दहन करायचा आहे हे सांगताना सरकारच्या अगणित योजनांचा पाढा वाचला. (फोटो सौजन्य - सुजय विखे पाटील फेसबुक)