होमफोटोविक्रमवीर 'हिटमॅन' टीम इंडियाला जिंकवून देईल का वर्ल्डकप?
विक्रमवीर 'हिटमॅन' टीम इंडियाला जिंकवून देईल का वर्ल्डकप?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणार आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा या सामन्यात भारताला विजय मिळवून देऊ शकेल का?
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आज विजेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगेल. (All Pics Credit - Indian Cricket Team)
रोहित शर्माचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स हा भन्नाट आहे. 100 पेक्षा अधिक चौकार आणि 50 पेक्षा अधिक षटकार टी-20 वर्ल्डकपमध्ये लगावणारा रोहित हा एकमेव कर्णधार आहे.
याव्यतिरीक्त टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने कर्णधार या नात्याने सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो धोनी आणि कोहलीनंतरचा तिसरा कर्णधार ठरलाय.
त्यामुळे आता टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात रोहित हाच भन्नाट फॉर्म सुरू ठेवून भारताला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.