होमफोटोउन्हाळ्यात या 5 गोष्टी फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका!
उन्हाळ्यात या 5 गोष्टी फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका!
स्वयंपाकघरातील आपला सर्वात जवळची वस्तू म्हणजे फ्रिज. विशेषत: उन्हाळ्यात फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अन्न पदार्थ स्टोर करण्यापासून ते फळं आणि भाजी फ्रेश ठेवण्यापर्यंत फ्रिज आवश्यक आहे. पण, फ्रिजचा वापर करण्यातही एक सावधगिरी बाळगली पाहिजे. काही खाद्यपदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नये. आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण, हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले तर त्याची चव आणि पोषक तत्व दोन्ही नष्ट होऊ शकतात. कोणते खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत हे पाहूया....
कापलेले बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. थंड हवेत बटाट्यामधील स्टार्काचं साखरेत रुपांतर होते. ते अमीनो अॅसिडमध्ये मिसळलं तर त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय फ्रिजमध्ये बटाटे ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकतात.
कांदा देखील फ्रिजमध्ये ठेवू नये. थंड हवेत त्याला बुरशी लागू शकते. तसंच ते नरम पडू शकतात. तुम्हाला कापलेला कांदा स्टोर करायचा असेल तर तो हवाबंद कंटेनरमध्ये ठेवावा.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवणे ही सामान्य गोष्ट आहे. पण, ती फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची चव आणि पोषक तत्वांवर परिणाम होऊ शकतो. या गोष्टी कायम ठेवण्यासाठी टोमॅटो सामान्य तापमानात स्टोर करणे हा सर्वात चांगला उपाय आहे.
तुळसही कधी फ्रिजमध्ये ठेवू नये. तुळस फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावरील चकाकता हिरवा रंग हरवतो. तसंच त्याची पानंही लवकर कोरडी होतात. तुम्ही तुळशीचं पानं फ्रिजच्या ऐवजी एका डब्यात ठेवू शकता. ती स्वयंपाकघरातील शेल्फवर सामान्य तापमानात ठेवावीत.
सुका-मेवा देखील दीर्घकाळ फ्रिजमध्ये ठेवू नये. हे पदार्थ फ्रिजमध्ये बराच काळ ठेवल्यास त्याला अन्य पदार्थांचा वास येऊ शकतो. ज्याचा परिणाम याच्या चवीवरही होतो. त्याऐवजी त्याला उन्हापासून दूर एखाद्या थंड ठिकाणी स्टोर करावे.