गातातही सुंदर, दिसतातही सुंदर; अभिनेत्रींनाही मागे टाकतील इतक्या देखण्या आहेत या गायिका
गोड गळ्याच्या या गायिकांनी आपल्या आवाजाने रसिकांना वेड लावलंच आहे. शिवाय आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळही केलंय. कोण आहेत या अभिनेत्री पाहुया.
-
श्रेया घोषाल- शास्त्रीय संगीताचा बाज असलेली गाणी असो अथवा फंकी, हटके गाणी असो श्रेया घोषाल ही संगीत दिग्दर्शकांची कायम पहिली पसंती असते. 37 वर्षांच्या श्रेयाचे शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी लग्न ठरल्याचे जेव्हा रसिकांना कळले तेव्हा कित्येक तरुण निराश झाले. अप्रतिम गायिका असलेली श्रेया ही दिसायलाही फारच सुंदर आहे .
-
कौशिकी चक्रबर्ती- प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती ही भारतीय शास्त्रीय गायनातील आघाडीची गायिका आहे. पतियाळा घराण्याच्या कौशिकीच्या गोड गळ्यातून ख्याल, ठुमरी ऐकणे ही पर्वणीच असते. कौशिकीचे गाणे ऐकताना गाणे ऐकावे की तिला पाहावे? अशी घालमेल तरुण रसिकांची होत असते.
-
श्वेता पंडीत- बॉलिवूडमधील कित्येक प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज देणारी श्वेता पंडीत ही दिसायला एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीइतकीच सुंदर आहे.
-
सोना मोहापात्रा- गीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायिका अशा वेगवेगळ्या भूमिका लीलया पार पाडणारी सोना ही दिसायला फारच सुंदर आहे.
-
शाल्मली खोलगडे- गायनात वेगवेगळे प्रयोग करणारी, खणखणीत आणि सुंदर आवाजाचे वरदान लाभलेल्या शाल्मलीने गायलेल्या गाण्यांवर तरुणाई बेभान होऊन नाचते. डिस्को, पबमध्ये तिची गाणी प्रचंड आवडीची आहेत. शाल्मलीचा आवाज जितका सुंदर आहे तितकेच तिचे सौंदर्य घायाळ करणारे आहे.
-
सुनंदा शर्मा- मूळची पंजाबी गायिका असलेल्या सुनंदा शर्माने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. हिंदी गाण्यांनाही आवाज दिलेल्या सुनंदाचे पॉप साँग जबरदस्त हिट झाली आहेत. कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पंजाबी सूट घालून चालणाऱ्या सुनंदाच्या चेहऱ्यावर उपस्थितांची नजर हटत नव्हती.
-
ध्वनी भानुशाली- ध्वनी भानुशालीचे पहिले गाणे 2018 साली प्रसिद्ध झाले होते. तेव्हापासूनच ती तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली होती. तिने स्वत:ने काम केलेल्या गाण्यांच्या व्हिडीओमध्ये रसिकांनी तिला पाहिले तेव्हा ही गायिका आहे का अभिनेत्री? असा क्षणभर प्रश्न पडला होता.
-
कनिका कपूर- कोरोना काळात वादाच्या भोवऱ्यात सापडलेली 'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूर ही दिसायला खूप सुंदर आहे. घाऱ्या डोळ्यांची आणि गोरीपान कनिकाची जादू चाहत्यांमध्ये कामय आहे. कनिकाचे वय 43 वर्षे असून ती तीन मुलांची आई आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.
Advertisement
Advertisement
Advertisement