होमफोटो‘याचि देही याचि डोळा'! तुकोबाच्या पालखीतील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात पार
‘याचि देही याचि डोळा'! तुकोबाच्या पालखीतील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात पार
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (Tukaram Palkhi Sohla 2024) बेलवाडी येथे आज संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे लक्ष लागून असलेले जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. 'विठोबा-रखुमाई' व 'ज्ञानोबा-तुकारामाच्या' जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमत होता.
सरतेशेवटी सर्वांचे लक्ष लागून राहिलेला अश्वांचा रिंगण सोहळा सुरु झाला आणि लाखो भाविकांचे डोळे अश्वांच्या शर्यतीचा तो विलोभनीय नयनरम्य असा क्षण टिपण्यासाठी सज्ज झाले.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांची एक परंपरा आहे. माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालतो तो माऊलींचा अश्व. तर, जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व अर्थात दुसरा अश्व.