‘याचि देही याचि डोळा'! तुकोबाच्या पालखीतील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात पार
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (Tukaram Palkhi Sohla 2024) बेलवाडी येथे आज संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे लक्ष लागून असलेले जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
-
लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा...
-
हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. 'विठोबा-रखुमाई' व 'ज्ञानोबा-तुकारामाच्या' जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमत होता.
-
सुरूवातीला बेलवाडी येथील कैलासवासी शहाजी मचाले यांच्या मेंढ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. तद्नंतर झेंडेकरी, हंडा तुळशी, विणेकरी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी, टाळकरी, पखवाजे, यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्या.
-
सरतेशेवटी सर्वांचे लक्ष लागून राहिलेला अश्वांचा रिंगण सोहळा सुरु झाला आणि लाखो भाविकांचे डोळे अश्वांच्या शर्यतीचा तो विलोभनीय नयनरम्य असा क्षण टिपण्यासाठी सज्ज झाले.
-
वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या देवाच्या अश्वाने मानाच्या घोड्याला शिवून रिंगण सोहळ्याला पूर्णविराम दिल्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
-
-
-
माऊलींच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांची एक परंपरा आहे. माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालतो तो माऊलींचा अश्व. तर, जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व अर्थात दुसरा अश्व.
-
हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचं रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाले, तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली, असं म्हटलं जातं.
-
एका ध्येयापासून निघून ध्येयपूर्ती करून, पुन्हा त्याच्या स्वरूपात येऊन मिळणे, हे रिंगण होय.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement