आसमंतात विठ्ठलाचा जयघोष अन् वारकऱ्यांमध्ये उत्साह, अकलूजमध्ये पार पडलं तिसरे गोल रिंगण
श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झालं.
-
श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूज येथील तिसरे गोल रिंगण पार अत्यंत आनंदात पार पडले. -
'तुकाराम तुकाराम'च्या जयघोषाने संपूर्ण अकलुज नगरी दुमदुमून गेली. -
सदाशिवराव माने विद्यालयात हा नेत्रदिपक सोहळा पार पडला. -
श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झालं. -
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वाचं तिसरं रिंगण पार पडलं. -
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिले रिंगण पार पडले, तर दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले. -
आज अकलूज येथे तिसरे रिंगण पार पडले. येथेच पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. -
हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. -
लाखोंचा जनसमुदाय जमला होता आणि अकलूज नगरी हरिनामाच्या घोषात दुमदुमून निघाली होती.
Advertisement
Advertisement
Advertisement