उन्नावमध्ये भीषण दुर्घटना! बस-दूध टँकरच्या अपघातात 18 जणांचा मृत्यू PHOTOS
बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात
-
उन्नावमधील भीषण दुर्घटनेची फोटो अतिशय भयावह आहेत. -
बस आणि दूध टँकरच्या झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 30 लोक गंभीर जखमी झाले आहेत. -
अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. -
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. -
ओव्हरटेक करत असताना दुधाच्या टँकरची बसला धडक बसली आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. -
दुर्घटनेदरम्यान दुधाचा टँकर देखील उलटला होता. -
अपघातावेळेस दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. -
दुधाच्या टँकरने ओव्हरटेक केले, त्यावेळेस दोन्ही वाहनांची धडक बसली व बस उलटली. -
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बिहारहून दिल्लीकडे जात होती. -
बसमधील बहुतांश प्रवासी हे बिहारमधील रहिवासी होते. -
काही तासांतच बस दिल्लीमध्ये पोहोचणार होती, पण त्यापूर्वीच भीषण दुर्घटना घडली. -
PHOTO CREDITS - PTI/ANI/IANS
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement