सेलिब्रिटींची घरे जळाली, लाखो लोक बेघर... लॉस अँजलिसची आग विझत का नाही?
अमेरिकेच्या लॉस अँजलिसमधील काऊंटीच्या सहा जंगलांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग रहिवासी भागातही पोहोचली आहे.
-
लॉस अँजेलिसला जगाची एंटरटेनमेन्ट कॅपिटल म्हटले जाते. हीच एंटरटेनमेन्ट कॅपिटल गेल्या दोन दिवसांपासून भीषण आगीशी झुंज देत आहे. आतापर्यंत या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो नागरिकांना स्थलांतर करावं लागलं आहे.
-
कॅलिफोर्नियातील अल्टाडेना भागातील ईटॉन येथून आग लागली, त्यामुळे त्याला ईटॉन आग असे म्हटले जात आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग अधिकच पसरली. एका भीषण आगीने मोठ्या निवासी परिसराला वेढले.
-
कॅलिफोर्नियात अलीकडच्या काही महिन्यांत पाऊस पडला नाही. म्हणजे येथे दुष्काळी परिस्थिती होती. त्यानंतर उन्हाळ्यात दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये अनेकदा जोरदार वारे वाहतात. त्याला सँटा अॅना विंड्स म्हणतात.
-
कोरड्या हवामानासह हे वारे धोकादायक बनतात. 100 किमी प्रतितासांहून अधिक वेगाने हे वार वाहतात. अशी परिस्थितीती कमी वेळात वेगाने ही आग पसरत आहे. सुकलेल्या जंगलामुळे देखील आग वेगाने पसरत आहे.
-
सरकारने नुकसानीची कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. एका खाजगी कंपनीच्या म्हणण्यानुसार, 135 अब्ज ते 150 अब्ज डॉलर्स म्हणजेच 11,610 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम युक्रेनच्या जीडीपीपेक्षा थोडी कमी आहे.
-
आगीत आतापर्यंत 30 हजार घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर जवळपास 2 लाख लोक घराबाहेर पडले आहेत.
-
हॉलिवूड सेलिब्रिटी पॅरिस हिल्टन, बिली क्रिस्टल, ॲडम ब्रॉडी, जेम्स वुड्स, अँथनी हॉपकिन्स, जॉन गुडमन, मँडी मूर या सेलिब्रिटींची घरे जळाली आहेत. तर स्टीव्हन स्पीलबर्ग, डायन कीटन आणि बेन ऍफ्लेक यांसारख्या सेलिब्रिटींना आपली घरे सोडावी लागली आहेत.
-
लॉस अंजेलिसमध्ये लागलेली आग इतकी मोठी आहे की ती अंतराळातूनही दिसत आहे. नासाने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement