संभळ सापडलेल्या विहिरीचा 1857च्या बंडाशी काय संबंध?
Sambhal Stepwell: संभळ शहरातील लक्ष्मण गंज परिसरामध्ये एक मोठी बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर सापडलीय.
-
उत्तर प्रदेशातील संभळ शहरातून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. येथे अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे. या मोहीमेदरम्यान शनिवारी (21 डिसेंबर) महसूल विभागाने चांदौसीतील लक्ष्मण गंज परिसरात सुरू केलेल्या उत्खननामध्ये सुमारे 150 वर्षे जुनी आणि 400 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारी पायऱ्यांची विहीर आढळलीय.
-
संभळचे जिल्हाधिकारी राजेंद्र पेंसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारे (ASI) या जागेचे सर्वेक्षण करण्याबाबत विचार केला जात आहे आणि आवश्यकता असल्यास याबाबत एएसआयला विनंतीही केली जाऊ शकते. प्रसिद्धी माध्यमांशी बातचित करताना पेंसिया यांनी सांगितले की,"या जागेची पूर्वी तलाव म्हणून नोंदणी करण्यात आली होती. विहिरीवरील मजल्याची विटांनी बांधणी करण्यात आलीय. तर दुसरा-तिसरा मजला संगमरवर दगडांनी बांधण्यात आलाय. या जागेच्या रचनेत चार खोल्या आणि एका विहिरीचा समावेश आहे".
-
विहिरीचा दुसरा-तिसरा मजला संगमरवरी दगडांनी तयार करण्यात आलाय. तर पहिला मजला विटांच्या मदतीने बांधण्यात आलाय. या जागेमध्ये एका विहिरीसह चार खोल्यांचा समावेश आहे. या संरचनेचे नुकसान होऊ नये, यासाठी माती हळूहळू काढली जातेय. सद्यस्थितीत या जागेचे क्षेत्रफळ केवळ 210 चौरस मीटर इतकेच वाटतंय,उर्वरित जागा ताब्यात घेण्यात आलीय. पायऱ्या असलेली ही विहीर किमान 150 वर्षे जुनी असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
-
जागेचा 1857च्या बंडाशी काय आहे संबंध? 1857मध्ये ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या बंडाच्या वेळेस सुटकेचा मार्ग म्हणून ही विहीर बांधण्यात आली होती, असा दावा केला जात आहे. अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान या विहिरीचा शोध लागला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीमध्ये दोन मूर्ती देखील सापडल्या आहेत. या मूर्ती वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सुरक्षित ठेवल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. (Photos Credit - PTI)