जम्मू-काश्मीरमधील कनेक्टिव्ही वाढीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. ही वंदे भारत ट्रेन स्नो रिमुव्हट टेक्नोलॉजीने सज्ज आहे. त्यामुळे ही ट्रेन बर्फवृष्टीदरम्यानही बिनदिक्कत चालणार आहे.
थंडीच्या काळात पाणी गोठणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, या केबल्समध्ये विशेष हीटिंग केबल्स बसवण्यात आल्या आहेत. या केबल्स विशिष्ट तापमान राखतात, ज्यामुळे केबलच्या आत असलेले पाणी गोठत नाही.
या ट्रेनमुळे येथील लोकांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. आतापर्यंत, खराब हवामानामुळे, विशेषतः हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे रेल्वे सेवा अनेकदा विस्कळीत होत असे, ज्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत होती.