बर्फवृष्टी, ऊन, वारा... जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही वातावरणात धावणार 'वंदे भारत ट्रेन'
जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही वातावरणात अनेक सोई सुविधांनी सज्ज असलेली वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
-
जम्मू काश्मीरमध्ये भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वंदे भारत ट्रेन डिझाईन करण्यात आली आहे. अनेक सोई-सुविधांसह ही ट्रेन अनेक आव्हानांचा सामना करु शकते.
-
जम्मू-काश्मीरमध्ये या ट्रेनची सेवा सुरु झाल्यानंतर जम्मू ते श्रीनगरचं अंतर केवळ 3 तासांवर येणार आहे. सध्या ही ट्रेन कटारा येथून चालवली जाणार आहे.
-
जम्मू-काश्मीरमधील कनेक्टिव्ही वाढीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. ही वंदे भारत ट्रेन स्नो रिमुव्हट टेक्नोलॉजीने सज्ज आहे. त्यामुळे ही ट्रेन बर्फवृष्टीदरम्यानही बिनदिक्कत चालणार आहे.
-
थंडीच्या काळात पाणी गोठणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, या केबल्समध्ये विशेष हीटिंग केबल्स बसवण्यात आल्या आहेत. या केबल्स विशिष्ट तापमान राखतात, ज्यामुळे केबलच्या आत असलेले पाणी गोठत नाही.
-
या ट्रेनमुळे येथील लोकांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. आतापर्यंत, खराब हवामानामुळे, विशेषतः हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे रेल्वे सेवा अनेकदा विस्कळीत होत असे, ज्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत होती.
-
ट्रेनची खास डिझाईन बर्फ, अति थंडी आणि इतर हवामानाशी संबंधित इतर आव्हानांना तोंड देऊ शकेल आणि प्रत्येक हंगामात अखंड सेवा देऊ शकेल.
Advertisement
Advertisement