जाहिरात

12GB RAM, 50MP कॅमेरा; Vivo T3 Ultra ची Flipkart वरील किंमत पाहून आश्चर्याचा धक्का बसेल

35हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फिचर्स असलेला मोबाईल फोन खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • जर तुम्ही 35 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Vivo T3 Ultra हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. Vivo T3 Ultra इ-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर आकर्षक सवलतीत उपलब्ध आहे. काय आहे ही सवलत पाहूयात.
  • 2GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटचा Vivo T3 Ultra ची किंमत फ्लिपकार्टवर 35,999 इतकी असणार आहे. सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटवर ऑफर देण्यात आली आहे. याद्वारे पेमेंट केल्यास 3000 रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच ही किंमत 32,999 रुपयांपर्यंत खाली येईल.
  • एक्सचेंज ऑफरमध्ये तुमचा जुना किंवा सध्याचा फोन देऊन तुम्ही 35,400 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तुमचा जुना फोन हा जितक्या चांगल्या स्थितीत असेल तितका तुमचा फायदा होईल.
  • Vivo T3 Ultra मध्ये 2800×1260 पिक्सेल, 20:9 आस्पेक्ट रेशो, 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट, 4500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR10 चे रिझोल्यूशनसह 6.78-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आहे.
  • Vivo T3 Ultra मध्ये Immortalis-G715 GPU सह octa core Mediatek Dimensity 9200+ 4nm प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 14 वर आधारित Funtouch OS 14 आहे.
  • Vivo T3 Ultra च्या मागील बाजूस f/1.88 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. या मोबाईलमध्ये f/2.0 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा आहे.
  • Vivo T3 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे जी 80W फास्ट चार्ज होते. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असलेल्या या फोनला IP68 रेटिंग आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com