वजन कमी करायचंय? मग खा हे परफेक्ट लो कॅलरीज् इंडियन फुड
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी परफेक्ट आहेत हे लो कॅलरीज् इंडियन फुड
-
काकडीची कोशिंबीर : काकडी आणि दही एकत्रित करून खाल्ल्यास शरीरास पोषकघटकांचा पुरवठा होतो. यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. वजन कमी करण्यासाठी पचनप्रक्रिया चांगली असणं आवश्यक आहे. काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते तसेच यामध्ये पोषकतत्त्व आणि फायबरचे प्रमाण देखील जास्त आहे.
-
तंदुरी फ्लॉवर : तंदुरी फ्लॉवर हा डिप फ्राय पदार्थ नाही, त्यामुळे तुम्ही या डिशवर ताव मारू शकता. फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे शरीराचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळते. हा पदार्थ तयार करताना अधिक प्रमाणात बटरचा वापर करू नये, हे लक्षात ठेवा.
-
उपमा : वजन घटवण्यासाठी उपमा हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. रव्यापासून तयार करण्यात येणाऱ्या या पदार्थामध्ये भरपूर प्रोटीन असते. ज्यामध्ये मटारसारख्या भाज्यांचा वापर केल्यास हा पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो. Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.