जाहिरात

संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच शिवसेनं 17 उमेदवारांची घोषणा केली. शिवसेनेच्या या निर्णयाचे मविआमध्ये पडसाद उमटले आहेत. विशेषत: काँग्रेस पक्षाचा दावा असलेल्या जागांवर शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज आहेत. महायुतीचे शिल्पकार संजय राऊत यांच्यावर त्यांची नाराजी असल्याचं मानलं जातंय.

April 01, 2024, 20:33
  • संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
    शिवसेनेनं जाहीर केलेल्या 17 जागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि मुंबईतील चार जागांचा समावेश आहे.
  • संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
    सांगली ही काँग्रेसची पारंपारिक जागा आहे. या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलीय. ( फोटो सौजन्य : @ShivSenaUBT_)
  • संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
    वायव्य मुंबईतून काँग्रेस नेते संजय निरुपम निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेनं अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिलीय. (फोटो सौजन्य : @AmolGKirtikar)
  • संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
    काँग्रेसचा जोर असलेल्या दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना पक्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. ( फोटो सौजन्य : @ianildesai )
  • संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
    शिवसेनेनं मुंबईतील उमेदवार जाहीर करताच संजय निरुपम आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस संजय राऊत यांच्या दावणीला बांधली असल्याची टीका निरुपम यांनी केलीय.
  • संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
    दिल्लीतील काँग्रेस हायकमांड संजय राऊत यांच्या कलानं कारभार करत असल्याचा राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे. (फोटो सौजन्य : @bharatjodo)
  • संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
    संजय राऊत हे महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जातात. पण, आता हेच राऊत जागा वाटपातील व्हिलन ठरत असल्याची चर्चा आहे.
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination