जाहिरात

नारीशक्ती! या राज्यांचाही रिमोट कंट्रोल होता महिला मुख्यमंत्र्यांच्या हाती

महाराष्ट्राप्रमाणे देशात अशी काही राज्ये आहेत ज्यांचा कारभार एकदाही महिलांच्या हाती गेलेला नाही. मात्र काही राज्ये अशी आहेत ज्यांचा गाडा मुख्यमंत्र्यांच्या रुपात तीन विविध महिलांनी हाकला आहे.

  • आतिशी मार्लेना यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. आतिशी यांच्यापूर्वी कोणकोणत्या राज्यांचा कारभार महिला मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये होता ते पाहुया.
  • काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांनी सर्वाधिक काळ दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 1998 ते 2013 या काळात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
  • शीला दीक्षित यांच्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी सांभाळले होते. मात्र त्या अल्प काळासाठी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या होत्या. सुषमा स्वराज यांच्यानंतर शीला दीक्षित यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले.
  • ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. 2011 साली ममता मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. 2021साली ममता यांना भाजपच्या सुवेंदू अधिकारींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर भवानीपूर मतदारसंघातून त्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकल्या होत्या.
  • मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद 4 वेळा भूषवले. 1995 साली त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्या उत्तर प्रदेशच्या आणि देशातील पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री आहेत.
  • उमा भारती यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषविले असून त्या 8 डिसेंबर 2003 रोजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.
  • वसुंधरा राजे यांनी राजस्थानचे दोनवेळा मुख्यमंत्री पद भूषविले आहे. 2003-2008 आणि 2013 ते 2018 या काळात त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.
  • आनंदीबेन पटेल या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. 22 मे 2012 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली होती.
  • राबडी देवी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे पती लालू प्रसाद यादव हे देखील बिहारचे मुख्यमंत्री होते. एखाद्या दाम्पत्याने राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.
  • जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हे देखील जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री होते. बापलेकीने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्याचे हे बहुधा देशातील एकमेव उदाहरण आहे.
Switch To Dark/Light Mode