जाहिरात

Women's T20 World Cup Semifinal : महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खळबळजनक निकाल!

Women's T20 World Cup Semifinal : दक्षिण अफ्रिकेच्या महिला क्रिकेट टीमने सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक केलाय.

  • दक्षिण अफ्रिकाने महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला आहे. त्यांनी UAEमध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
  • पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला जिंकण्यासाठी 135 रन्सचं टार्गेट दिलं हेतं. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्स राखून पराभव केला.
  • या विजयानंतर दक्षिण अफ्रिकेनं T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली. सहा वेळा महिला T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियानं 5 आऊट 134 रन्स केले होते.दक्षिण आफ्रिकेनं 135 रन्सचं आव्हान 17.2 ओव्हर्समध्ये अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
  • दक्षिण आफ्रिकेकडून ॲन बॉशनं 48 चेंडूत सर्वाधिक नाबाद 74 रन्सची मॅच-विनिंग इनिंग खेळली. तर कॅप्टन लॉरा वोल्वार्डनंही 42 रन केले. केल्या.
  • ऑस्ट्रेलियानं महिला क्रिकेट टीमला T20 वर्ल्ड कप फायनल गाठण्यास अपयश आल्याची 15 वर्षांमधील ही पहिलीच घटना आहे. (All Photo Credit - PTI)