Z Morh Tunnel : झेड-मोऱ्ह बोगदा भारतासाठी इतका महत्त्वाचा का आहे ? मोऱ्ह शब्दाचा अर्थ काय आहे ?
या बोगद्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे उपस्थित होते. या बोगद्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक केले.
-
कश्मीर, लडाखमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर इथल्या दुर्गम भागांचा देशाशी संपर्क तुटतो. या बोगद्यामुळे ही समस्या कायमची दूर होणार आहे. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पर्यटकांसाठीही हा बोगदा पर्वणी ठरणार आहे. या बोगद्यामुळे लडाखमध्ये वर्षभरात कधीही ये-जा करणे शक्य होणार आहे.
-
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी या बोगद्याबद्दल बोलताना सांगितले की, या बोगद्यासाठी पाचवेळा टेंडर बोलावण्यात आली होती. या संपूर्ण प्रकल्पातील बोगद्यांसाठी 12 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पातील बोगदे 6800 कोटींमध्ये तयार झाले. गडकरी यांनी सांगितले की या बोगद्यांच्या निर्मितीमध्ये 5 हजार कोटींची बचत झालीय.
-
या बोगद्याच्या बांधकामामुळे 12 किलोमीटरवरील अंतर आता 6.5 किलोमीटरवर आले आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा कालावधी लागेल. या बोगद्यातून वाहने 80 किमी प्रति तास वेगाने जाऊ शकतील. एका तासात बोगद्यातून 1 हजार वाहने प्रवास करतील. हा बोगदा 6.5 किलोमीटर लांबीचा आहे. झेड मोऱ्ह बोगदा समुद्रसपाटीपासून 8,500 फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहे.
-
या प्रकल्पांतर्गत बांधल्या जाणाऱ्या दोन बोगद्यांपैकी पहिला बोगदा गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यानचा झेड-मोऱ्ह बोगदा आहे.दुसरा बोगदा म्हणजे झोजिला बोगद्याची लांबी 14 किलोमीटर आहे आणि हा मार्ग बालटालहून झोजिला जवळील मिनीमार्ग म्हणजे द्रासपर्यंत असणार आहे. झोजिला बोगद्याचे काम वर्ष 2026पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.