लाडक्या बहीणींना राज्य सरकार रक्षाबंधनाची भेट देणार आहे. लाडक्या बहीणीचा जुलै महिन्याचा हाफ्ता कधी दिला जाणार याची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही लाडक्या बहीणींसाठी शुषखबर समजली जाते. बहीणींना रक्षाबंधनाची ओवाळणी या निमित्ताने मिळणार आहे. विशेष म्हणजे लाडक्या बहीणींच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत याची सर्वांनाच उत्सुकता होती. तेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा - 33 वर्षांत पहिल्यांदाच शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार, शामची आई ही ठरला सर्वोत्तम
आदिती तटकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे असं सांगितलं आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरीत केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. जुलै महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत असं ही त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Bin Lagnachi Goshta Teaser : ‘बिन लग्नाची गोष्ट' टीझर रिलीज; नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल असं ही तटकरे यांनी सांगितलं आहे. लाडकी बहीणी योजनेचा अनेक पुरूषांनीही लाभ घेतला होता. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. अनेक अपात्र महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आलं. यावरून ही सरकारवर टीका झाली होती.