राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे. काही दिवसात सरकार स्थापनही होईल. पण महायुतीचं सरकार स्थापन होण्या आधीच महायुतीत खटके उडायला लागले आहे. वादाची पहिली ठिणगी रायगडमध्ये पडली आहे. हा वाद इतका वाढला आहे की माजी पालकमंत्री असलेल्या लाडक्या बहिणीचा बाप काढण्यापर्यंत मजल गेली आहे. कर्जतचे शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आदिती तटकरे यांच्यातला हा वाद टोकाला गेला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महेंद्र थोरवे हे कर्जत मतदार संघातून काठावर विजयी झाले. त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले. याला राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे हे जबाबदार असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला होता. त्यावरून आदिती तटकरे यांनी थोरवे यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे. थोरवे हे काय बोलत आहेत त्याला मी फार महत्व देत नाही. ते काठावर पास झाले आहेत. त्यांनी आधी त्यांचा मतदार संघ सांभाळावा. यशाची हवा डोक्यात जावू देवू नका असा सल्ला ही त्यांनी दिली. आपण 82 हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो आहोत. थोरवेंच्या मतदार संघात जरा जरी इकडे तिकडे झाले असते तर वेगळा निकाल लागला असता असंही ते म्हणाले. शिवाय मंत्री कोणाला करायचे हे थोरवेंनी सांगण्याची गरज नाही. स्थानिक आमदार ते ठरवत नसतात असा टोलाही त्यांनी थोरवेंना लगावला.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
आदिती तटकरे यांनी थोरवे हे काठावर पास झाले असं वक्तव्य केलं. हे महेंद्र थोरवे यांच्या मनाला चांगलेच लागले आहे. त्यांना याचा प्रचंड राग आला. मी काठावर पास झालो नाही. तर मी 5700 मतांनी निवडून आलो आहे. माझं मताधिक्य नक्कीच घटलं आहे. पण त्याल जबाबदार तुझा बाप आहे असं थेट महेंद्र थोरवे म्हणाले. महायुती असतानाही इथं सुनिल तटकरे यांनी अपक्ष उमेदवार उभा केला. मला पाडण्याचा प्रयत्न केला. अपक्षाला छुप्या पद्धतीने मदत केली गेली असा आरोपही यावेळी थोरवे यांनी केली.
ट्रेंडिंग बातमी - 'एकनाथ शिंदे इतके दिवस गप्प का होते?' काँग्रेसचा एक सवाल अन् अनेक शंका
शिवाय जे मताधिक्य घटलं ते पालकमंत्र्यांना म्हणा, हे तुमच्या बापाचं पाप आहे. माझं मताधिक्य तुमच्या बापामुळे घटलं आहे. मात्र मी काठावर निवडून आलेलो नाही. असं ही त्यांनी ठणकावून सांगितलं. खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे नागरी सत्कार प्रसंगी पत्रकार परिषदेत आमदार थोरवे यांनी ही जहरी टीका केली आहे. निवडणुकी आधी ही थोरवे यांनी सुनिल तटकरेंना लक्ष्य केलं होतं. तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे. तो वेळीच कापून टाका नाही तर महायुती खराब होईल अशी टीका केली होती.