विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने सपाटून मार खाल्ला. त्यांचा एकही आमदार निवडून येवू शकला नाही. ऐवढेच काय तर त्यांचा मुलगा अमित ठाकरेही पराभूत झाला. शिवाय तिसऱ्या क्रमांकावरही फेकला गेला. त्यानंतर राज ठाकरे काही काळ शांत होते. त्यांनी कुठलेही राजकीय वक्तव्य केले नाही. मात्र ज्यावेळी त्यांनी पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्याच बरोबर त्यांना दोन खडे बोलही सुनावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांच्या मनसेचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. त्यानंतर राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणूकीच्या निकालावर त्यांनी टीका केली आहे असं अजित पवार म्हणाले. शिवाय राज ठाकरेंना त्यांचा मुलाला ही निवडून आणता आले नाही. त्यांनी आम्हाला सांगू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांना मते मिळाली मग गेली कुठे असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केले. लोकसभा निवडणुकीत आम्हालाही फटका बसला. आमचा एकच खासदार निवडून आला. त्यावेळी आम्ही काही रडत बसलो नाही असं ही अजित पवारांनी सुनावलं.
ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळले? यादी आली समोर
विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या मेळाव्यात सर्वाधिक टीका ही अजित पवारांवर राज यांनी केली होती. लोकसभेला अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला होता. त्यांचे 41 आमदार कसे काय निवडून येवू शकतात असा प्रश्नही त्यांनी केला. त्यामुळे निवडणुकीत काही तरी गडबड झाल्याचा संशय त्यांनी उपस्थित केला. हा विजय खरा विजय नाही. चार महिन्यात असं काय घडलं की इतकं मोठं बहुमत मिळालं असा सवाल ही राज यांनी यावेळी उपस्थित केला होता.
दरम्यान यावेळी अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबतही महत्वाची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महीलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे. त्यात आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. असं असलं तरी पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महीलांना लाभ देण्यासाठी सर्वे सुरु आहे असंही ते म्हणाले.