एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण त्यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. खडसे भाजपमध्ये प्रेवश केल्यानंतर त्यांना राज्यपाल केलं जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळेच त्यांना राज्यपाल केलं जावू नये अशी मागणी करणारं पत्रच थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहीलं आहे. एकनाथ खडसे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यामुळे त्यांना राज्यपाल करू नये अशी असं या पत्रात म्हटलं आहे.
राष्ट्रपतींना कोणी लिहीलं पत्र?
एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहे. येत्या काही दिवसात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. ते स्वगृही परततील. यानंतर खडसेंना राज्यपाल केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. हीबाब लक्षात घेता सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहीलं आहे. सहा पानी पत्रात त्यांनी खडसें विरोधात प्रलंबित असल्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल करू नये असं त्यांनी या पत्राद्वारे मागणी केली आहे.
पत्रामध्ये नक्की काय?
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोणत्याही राज्याच्या/ केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्याची कोणतीही शिफारस नाकारण्याचे आवाहन राष्ट्रपतींना केले आहे. त्याची प्रत पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही पाठवली आहे. अशी माहिती ट्वीटद्वारे दमानिया यांनी दिली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या ६ पानी पत्रात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही. राष्ट्रपतींना वस्तुस्थिती समजावून सांगणारे अपील केले आहे असंही त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात. मला विश्वास आहे की त्या देशहिताच्या विरोधात काम करणार नाहीत असं त्यांनी सर्वात शेवटी म्हटलं आहे.
खडसेंच्या भाजप प्रेवशाला विरोध?
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण त्यांच्या प्रवेशाला भाजपच्या काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी यासंदर्भात उपाहासात्मक प्रतिक्रिया दिली होती. खडसे यांचे संबंध दिल्लीत आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, असं म्हटलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपणास याबाबत अधिकृत माहिती नाही. वरिष्ठ नेत्यांनी कळवल्यानंतर त्याचं स्वागत करू असं म्हटलं होतं. त्यामुळे खडसेंची पुढची वाटचाल कशी असेल याची चर्चा सध्या सुरू आहे.