महाराष्ट्र आणि झारखंड कसं जिंकणार? वाचा भाजपा-काँग्रेसचा पूर्ण प्लॅन

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. दोन्ही राज्यांच्या निवडणुका देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. दोन्ही राज्यांच्या निवडणुका देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात एनडीएचं सरकार आहे. तर झारखंडमध्ये इंडिया आघाडी सत्तेवर आहे. दोन्ही राज्यात आघाडी सरकार सत्तेत असून त्यांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केलीय. महाराष्ट्रत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांचं आघाडी सरकार आहे. तर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील इंडिया आघाडीला भाकपाच्या एन्ट्रीनं आणखी भक्कम केलं आहे. 

महाराष्ट्रात काय आहे आघाडीचं गणित?

महाराष्ट्रातील सत्तारुढ एनडीए आघाडीमध्ये भाजपासह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. तीन्ही पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. अजित पवारांच्या पक्षाची कामगिरी तर अत्यंत निराशाजनक झाली होती.

इंडिया आघाडीत काँग्रेससह उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. या आघाडीनं लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. महाराष्ट्रात इंडिया आघाडी महाविकास आघाडी या नावानं एकत्र आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या आघाडीची स्थापना झाली. तर सत्तारुढ एनडीएला महायुती नावानं ओळखली जाते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत महाविकास आघाडीची शेवटपर्यंत जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. पण, त्यांची आघाडी झाली नाही. सध्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मविआ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बोलणी सुरु असल्याची चर्चा आहे. 

Advertisement

महायुतीचं जागावाटप नक्की

महाराष्ट्रात महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 90 टक्के जागांचं वाटप नक्की झालं आहे. 288 पैकी 158 जागांवर भाजपा निवडणूक लढवणार आहे. शिवसेना शिंदे गट 70 तर अजित पवारांचा राष्ट्रवादी 50 जागांवर निवडणूक लढेल. महायुतीच्या नेत्यांमध्ये 288 पैकी 230 जागांवर सहमती झाली आहे. अन्य जागांवर सहमती झाल्यावर दोन-चार दिवसांमध्ये याची माहिती मीडियाला दिली जाईल. याबाबत येत्या काही दिवसांमध्ये मीडियाला माहिती दिली जाईल.


महाविकास आघाडीचं समीकरण काय?

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीपूर्वी सावध झालं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि शिवसेना राज्यात 100-100 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 84 जागा मिळू शकतात. 4 जागा लहान पक्षांना सोडल्या जाऊ शकतात. काही जागांवर परस्पर संमतीनं फेरबदल होण्याची शक्यता आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : 'महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही', काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना 3 विषयांवर वॉर्निंग )

झारखंडमध्ये काय चाललंय?

झारखंडमध्ये भाजपाला मोठी आशा आहे. लोककसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतरही भाजपाला 14 पैकी 9 जागा जिंकण्यात यश आलं आहे. भाजपानं राज्यात पहिल्यांदाच वेगवेगळ्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. भाजपा जनता दल युनायटेड, ऑल झारखंड स्टुडंट युनियन, लोजपा रामविलास पक्षांसोबत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. 

झारखंडमध्ये जागावाटपाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. पण, भाजपा किमान 67 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. ऑल झारखंड स्टुडंट युनियनला 9 ते 11 जागा मिळू शकतात. जनता दल युनायटेडला 2 आणि लोजपा रामविलासला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. 

Advertisement

काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आघाडीला गेल्या विधानसभा निवडणुकीत 81 पैकी 47 जागांवर विजय मिळवला होता. मागील निवडणुकीत जेएमएमला 30, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रीय जनता दलाला 1 जागा मिळाली होती. या निवडणुकीत इंडिया आघाडीत भाकपाचा प्रवेश झाला आहे. झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत जेएमएम जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे.   

( नक्की वाचा : अमित शाहांना हरियाणात पाठवण्याची वेळ का आली? दमदार विजयानंतरही भाजपाची डोकेदुखी कायम! )

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये समानता काय?

महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात भाजपा आणि काँग्रेस आघाडीतील पक्षांवर अवलंबून आहे. आपली आघाडी भक्कम करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. दोन्ही राज्यात प्रादेशिक पक्षाचे नेते मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे तर झारखंडमध्ये जेएमएमचे हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहेत. दोन्ही राज्य आर्थिक दृष्टीनंही अतिशय महत्त्वाचे आहेत.