'पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला', शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची Audio Clip Viral

Pankaja Munde : पंकजा यांचा हा पराभव मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टरमुळे झाला, अशी चर्चा सुरु आहे. त्यातच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
Pankaja Munde
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

बीड लोकसभा निवडणुकीची (Beed Lok Sabha Election 2024) चर्चा अजूनही सुरु आहे. भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) निवडणुकीच्या रिंगणात होता. शेवटच्या फेरीपर्यंत या निकालाचं पारडं वर-खाली होत होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा यांचा पराभव केला. पंकजा यांचा हा पराभव मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टरमुळे झाला, अशी चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांना महायुतीमधील वादाचा फटका बसल्याचंही समोर आलंय. याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बीडमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ही ऑडिओ क्लिप आहे, असं सांगितलं जात आहे. यामध्ये खांडे स्वत: पंकजा मुंडे यांना धोका दिल्याची कबुली देत आहेत. आपण पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना असा धोका दिला आहे, असं खांडे या क्लिपमध्ये सांगत आहेत. 

त्याचबरोबर धनंजय मुंडे बीडमध्ये येताच त्यांच्या वाहनावर मी हल्ला करतो असंही त्यांनी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हंटल्याचं दिसत आहे. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची या ऑडिओ क्लिप आता वायरल झाली असून याची जोरदार चर्चा सध्या बीडमध्ये सुरु आहे.

( नक्की वाचा : 'वडीगोदरीमध्ये पाहा, वाह रे वाह', पंकजा मुंडे यांचा इशारा कुणाकडं? )
 

भाजपाची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच भारतीय जनता पक्षानं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या क्लिप मधील संवाद ऐकला तर हा सर्व प्रकार धक्कादायक आहे.महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही सर्वजण सोबत काम करत होतो. आता जी क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने विरोधी उमेदवाराचे काम केल्याची कबुली दिली आहे या क्लिपची  सत्यता तपासून आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत, असं भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हंटलं आहे. 

Advertisement