Bharat Gogawale: 'नारायण राणेंनी मर्डर केले' राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब

Bharat Gogawale : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bharat Gogawale: भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
सिंधुदुर्ग:

गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी 

महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. रायगडमधील पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी ते अजूनही प्रयत्नशील आहेत. पालकमंत्रिपदासाठी त्यांनी अघोरी पुजा केली होती, असे आरोप झाले आहेत. हा वाद शांत होण्यापूर्वीच गोगावलेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नारायण राणे यांनी मर्डर केले!

माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. त्यांनी अंगावर केलेले घेतल्या. मारामारी केली. मर्डरही केले, सगळं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, असं धक्कादायक वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. 

विशेष म्हणजे नारायण राणेच्या मतदारसंघाचे खासदार आहेत त्याच सिंधुदुर्गमध्ये गोगावले यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य करत असताना नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार निलेश राणे देखील उपस्थिक होते.  निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही सगळं जुळवून चालायचं. आम्हाला पण जुळवून घ्यावं लागतं हा आमचा सल्ला आहे, असंही सांगायला गोगावले यावेळी विसरले नाहीत.

( नक्की वाचा : Dombivli News : ऐन पावसाळ्यात डोंबिवलीकर होणार बेघर, 'ती' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश )
 

गोगावलेंची वादग्रस्त कारकिर्द

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी घरामध्ये अघोरी पूजा केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरे गटानंतर आता महायुतीमधील शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही भरत गोगावले यांचा नवीन व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून भरत गोगावलेंनी घरात अघोरी पूजा केल्याचा दावा त्यांनी केला होता.

Advertisement

बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री... असं सूरज चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी भरत गोगावलेंनी ही अघोरी पूजा केली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार कलगीतुरा सुरु आहे. त्यातच गोगावले यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. 

Topics mentioned in this article