भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाने उमेदवारी जाहीर करण्या आधीच मेहता यांनी आपली उमेदवारी जाहीर करून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. शिवाय पक्ष हा निवडणुकी पुरता असतो त्या आधी आणि त्यानंतर सामाजिक बांधिलकी ही महत्वाची असते, असे सांगत त्यांनी बंडाची भाषा केली आहे. 2019 च्या निवडणुकीत प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर मेहता हे राजकारणाच्या मुळ प्रवाहापासून दूर होते. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही त्यांना प्रचारापासून दूर राहण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेहता हे सध्या पक्षात नाराज आहेत. त्यांनी निवडणूक लढणार असे जाहीर करत या नाराजीला वाट करून दिली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रकाश मेहता मित्र मंडळाच्या माध्यमातून एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून प्रकाश मेहता यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचारापासून रोखण्यात आले होते असा गौप्यस्फोटही मेहता यांनी केला. शिवाय निवडणुकीत नियोजनही चुकले. त्यामुळेच पराभव झाला असेही ते म्हणाले. आपण आतापर्यंत सात वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. पण एकदाही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. पक्षाने समोरून उमेदवारी दिली होती. यावेळी मात्र आपण निवडणूक लढणार आहे. त्यासाठी तयारीला लागा असा आदेश त्यांनी आपल्या समर्थकांनी दिला.
ट्रेंडिंग बातमी - अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? तो आमदार कोण?
2019 विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहता यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. त्यावेळी मेहता हे गृहनिर्माण मंत्री होते. त्यांच्यावर त्यावेळी भ्रष्ठाचाराचे आरोपही झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ऐवजी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत शहा यांचा विजय झाला. त्यानंतर प्रकाश मेहता काही काळ राजकारणापासून दूर होते. गेली पाच वर्षे आपण शांत होतो. काही बोललो नाही. पण गेल्या तिन चार महिन्यापासून अनेक लोक आपल्याला भेटत आहेत. त्यांची भावना पाहात ही निवडणूक आपण लढली पाहीजे असे मेहता म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं
भाजपने उमेदवारी दिली नाही तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढायची हे प्रकाश मेहता यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. प्रकाश मेहता हे भाजपाचे सहा टर्मचे आमदार आहेत. त्यांनी घाटकोपर पूर्व येथून या निवडणुका लढवल्या आहेत. प्रमोद महाज यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. पुर्व उपनगरातला गुजराती चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहीले जात होते. युती सरकामध्येही मेहता हे मंत्री होते. तर फडणवीसांच्या मंत्रीमंडळातही गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यात विद्यमान आमदार पराग शाहा गेली अनेक दिवस प्रकृती ठीक नसल्याने थोडे कमी सक्रीय आहेत. अशा वेळी मेहता यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे.