हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कार्यकर्त्यांसमोर शेवटी बोललेच

हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांच्या गटात प्रवेश करतील हे जवळपास निश्चित मानला जातयं. तसे संकेतही हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

देवा राखुंडे 

इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यानंतर भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर हर्षवर्धन पाटलांची शरद पवारांसोबत जवळीक वाढल्याचं पहायला ही मिळालं आहे. हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांच्या गटात प्रवेश करतील हे जवळपास निश्चित मानला जातयं. तसे संकेतही हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत. शिवाय भाजपवरची नाराजीही ते लपवू शकलेले नाहीत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीत इंदापूर विधानसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा होती. विद्यमान आमदार त्याला तो मतदार संघ असे सुत्र ठरले होते. त्यानुसार इंदापूर अजित पवारांच्या पारड्यात जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजपनेते हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटल हे अपक्ष निवडणूक लढणार अशी चर्चा होती. अजित पवारांनी आपल्याला लोकसभे वेळी शब्द दिला आहे असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला होता. पण त्यानंतर अजित पवारांनी इंदापूरच्या जनसन्मान यात्रेत दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत देत पाटील यांना कात्रजचा घाट दाखवला.  

ट्रेंडिंग बातमी - 'कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात' सावंत हे काय बोलले?

त्यानंतर हर्षवर्धन पाटील हे भलतेच आक्रमक झाले. इंदापूर तालुका विकास आघाडीतून पाटील विधानसभा लढण्याची तयारी करत होते. त्याच वेळी त्यांनी पुण्यात शरद पवार याची भेट घेतली. दोन ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. त्यानंतर बावड्यातील जनसंवाद मेळाव्यात मला सर्वांचे फोन येत आहेत. त्याचा नीट अर्थ समजून घ्या.अद्याप मी कोणालाही होकार दिला नाही. असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलयं. अजित पवार बोलले तो महायुतीतील धर्म नाही. जागावाटप झालं नसताना हा अधिकार महायुतीतील एका पक्षाला दिला कसा काय ? असा प्रश्न ही हर्षवर्धन पाटलांनी उपस्थित केला आहे.

ट्रेंडिंग बातमी -  'कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं' सत्तारांचे ते वक्तव्य, निशाणा कोणावर?

दरम्यान हर्षवर्धन पाटलांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर टोकाचं वक्तव्य केलयं. मी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नसताना या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर इंदापूर तालुक्यातील सामान्य माणसांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? या गोष्टी चांगल्या नाहीत. हर्षवर्धन पाटील आयुष्यात सर्व काही सहन करेल पण अपमान सहन करणार नाही असं हर्षवर्धन पाटलांनी बावनकुळे यांना खडसावून सांगितलं आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे

हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून त्यांना उमदेवारी हवी आहे. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांचे काम केले होते. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांना शब्द देण्यात आला होता. त्याचा उच्चारही पाटील यांनी केला. पण अजित पवारांनी तर दत्ता भरणे यांची उमदेवारीच जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या समोर भाजप सोडण्या शिवाय आणि बंडखोरी केल्या शिवाय पर्याय राहीला नाही. त्यामुळेच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत काही झाले तरी इंदापूरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे ही लढत नक्कीच पाहायला मिळणार आहे. 

Advertisement